५ टेस्टी-टेस्टी लाडू रेसिपी

लाडू हा लहानांपासून मोठ्यांपर्यंतचा आवडतीचा पदार्थ आहे. हा पदार्थ केवळ सणावारीच नाही तर अनेक प्रसंगी बनविला जातो. आपणासाठी असेच ५ प्रकारचे लाडू घेऊन आलो आहोत जे बनविण्यासही सोपे आणि खाण्यास अतिशय टेस्टी आहेत. पाहा ५ टेस्टी-टेस्टी लाडू रेसिपीज.
१. चॉकलेट लाडू


भारतात अनेकविध प्रकारचे लाडू बनविले जातात. पारंपरिक पद्धतीने लाडू बनविण्यासाठी बराचसा वेळ खर्च करावा लागतो पण आपण चॉकलेट लाडू बनविणे फारच सोपे काम आहे. केवळ १० मिनिटातच हे लाडू खाण्यासाठी तयार होतात.
लहान मुलांना हे लाडू फारच आवडतील यात तर शंकाच नाही.

२. ओट्स ड्राय फ्रुट लाडू


ओट्स आणि ड्राय फ्रुट आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचे आहे ते सांगायला नको.  खासकरुन हिवाळ्यात हे लाडू खाणे आरोग्यासाठी खूपच लाभदायक आहे. केवळ ओट्स खाणे आपल्याला आवडत नसेल तर ओट्स आणि ड्राय फ्रुटचे लाडू बनवून खा. आरोग्याला नक्कीच फायदा होईल.


३. शेंगदाण्याचे लाडू


हेल्दी लाडू रेसिपींमध्ये अजून एक नाव आहे ते म्हणजे शेंगदाण्याचे लाडू.  बनविण्यास अतिशय सोपे आणि  टेस्टी असलेले हे लाडू फारच मऊ असल्याने मुलांना तसेच वृद्धांनाही ते खाण्यास सोपे आहेत. शेंगदाण्याचे लाडू बनविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या गुळामध्ये लोहाचे तसेच शेंगदाण्यामध्ये असणाऱ्या प्रोटीनच्या भरपूर प्रमाणामुळे शरीराला पोषकतत्वे देणारे हे लाडू नक्की बनवा.
हे लाडू एक आठवड्यापर्यंत चांगल्या स्थितीत राहु शकतात. जर  फ्रिजमध्ये ठेवले तर ते १५-२० दिवस आरामात टिकतील
 

४. तीळ-खजूराचे लाडू


शरीरातील रक्ताचे कमी प्रमाण भरुन निघण्यासाठी खजूर खाणे फारच फायदेशीर असते तर तीळ हे शरीराला उष्णता देते. असे हे लाडू थंडीच्या दिवसात बनवून खाणे फारच फायदेशीर ठरते. शरीराची वाढ कमी होणाऱ्या मुलांना हे लाडू नक्कीच खायला द्यावे.
मधुमेह आणि हदयरोग्यांसाठीही हे लाडू उपयुक्त आहेत.

५. नारळाचे लाडू
सर्व प्रकारच्या लाडूंमध्ये सर्वात सोप्या पद्धतीने तयार होणारे लाडू म्हणजे नारळाचे लाडू. कमी साहित्यामध्ये तयार होणारे हे लाडू अत्यंत चविष्ट लागतात.
पण हे लाडू जास्त दिवस टिकत नाही. त्यामुळे ते लवकर संपविण्याची तयारी असेल तर बनविणे उत्तम. 
अन्य रेसिपीराजस्थानमधील मांसाहारीप्रेमी लाल मास खूप चवीने खातात.More
बटाटे-मंगोडीची भाजी ही राजस्थानMore
अनेक भाज्यांपासून बनलेली चविष्ट रेसिपी सब्ज रोगन जोश हीMore
मशरुम शागुटी ही एक मशरुम रेसिपी आहे. यात प्रामुख्याने बटणMore
कोलीफ्लावर म्हणजेच फुलकोबी हीMore

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data