५ बेस्ट महाराष्ट्रीयन स्नॅक्स रेसिपी

मुळतः महाराष्ट्रीयन डिश या तिखट असतात. बऱ्याचदा महाराष्ट्रीयन स्नॅक्स रेसिपींमध्ये शेंगदाणे, तीळ आणि हिरव्या तसेच लाल मिरचींचा वापर केला जातो. तोंडला पाणी येईल अशा या काही महाराष्ट्रीयन डिश तुम्ही नक्की ट्राय कराव्या अश्याच आहेत.
१. अंड्याची खांडोळी


अंडी खाणे सर्वांनाच आवडते. त्याचे कारणही तसेच आहे. एका अंड्यापासून कितीतरी प्रकारचे पदार्थ आपल्याला बनवता येतात.
अंड्याची खांडोळी हा ब्रेड-ऑम्लेटचाच एक प्रकार आहे. तो फक्त जरा वेगळ्या पद्धतीने बनविला जातो. ही एक अशी डिश आहे जी सकाळच्या नाश्त्यालाही तसेच सायंकाळी स्नॅक्स म्हणूनसुद्धा खाता येईल.

२. कोल्हापुरी मिसळ


महाराष्ट्रात येऊनही जर कोल्हापुरी मिसळ खाल्ली नाही तर तुमची महाराष्ट्र सफर अर्धवट राहिली असे समजा. सकाळचा नाश्ता करायचा असेल तर याहून चांगला असूच शकत नाही. कडधान्यांचे मिश्रण आणि त्यावर तिखट रस्सा आणि पाव. बराच वेळ या डिशचा स्वाद तुमच्या जीभेवर रेंगाळत राहिल.

३. पाव-भाजी


मुंबईमधील लोकांचे आवडते स्ट्रीट फुड म्हणून पाव-भाजी ओळखले जाते. खास बटरमध्ये बनविण्यात आलेल्या पावभाजीची चव तर विचारायलाच नको.
डी डिश बनविण्यासाठी थोडा वेळ लागतो पण जर खााण्याची इच्छा झाली तर तुमच्या शहरातील हॉटेलमध्ये ही डिश मिळेल.

४. स्टफ्ड अंडा पराठा
 

लहान मुले भाजी-पोळी खाण्यास मुले कंटाळ करत असतील स्टफ्ड अंडा पराठा हा एक चांगला पर्याय आहे. अंडे असल्यामुळे मुलांसाठी हा आरोग्यपूर्ण आहार आहे. सॉस अथवा चटणीसोबत खाल्ल्यास स्टफ्ड अंडा पराठा छान लागतो.

५. राईस कॉर्न टिक्की


उकळलेले कॉर्न, भात आणि शेंगदाण्यापासून बनलेली ही डिश चवीला तिथट लागते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे.
राईस कॉर्न टिक्की बनविण्सास फारसा वेळ लागत नाही. पुदीना अथवा कोथिंबीरीच्या चटणीबरोबर राईस कॉर्न टिक्की आपल्या पाहुण्यांना सर्व्ह करा.

अन्य रेसिपीकोलीफ्लावर म्हणजेच फुलकोबी हीMore
तिखट झणझणीत मटन बनवण्यासाठी हे रेसिपी नक्कीच ट्रायMore
गाजरापासुन बनवलेले वेगळे आणि अतिशय स्वादिष्टMore
खास मांसाहारी प्रेमींनसाठी घेऊन आलो आहोत, चिकन आणि गाजराचेMore

लोकप्रिय रेसिपी

No Data
No Data